या कारणामुळे Zomato आणि Swiggy होणार बॅन?

नवी दिल्ली- Zomato आणि Swiggy या दोन्ही फुड डिलीव्हरीच्या ॲप बॅन होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात गुगल प्ले स्टोअरने त्यांना नोटीस बजावली आहे. या दोन्ही ॲप्सना गुगलकडून प्ले स्टोअर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नोटीस देण्यात आली आहे. दोन्ही अ‍ॅप्सना त्यांच्या अ‍ॅपमध्ये खेळाचे फिचर जोडल्यामुळे हि नोटीस बजावण्यात आली आहे

गुगलकडून पेटीएमवर स्पोर्ट्स बेटिंग पॉलिसीचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता.  Paytm ला प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले होते. मात्र त्यानंतर काही तासांनंतर Paytm ॲप पुन्हा प्ले स्टोअरवर आले.

नोटीस मिळाल्याचे Zomatoकडून मान्य करण्यात आलं आहे. मात्र त्यांच्याकडून यास ‘अन्यायकारक’ असे म्हणण्यात आले आहे.  ‘हो, आम्हाला Google कडून एक सूचना प्राप्त झाली आहे, असं Zomatoच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.