अहमदनगर : जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष व पंचायत समिती सभापतींची मुदत आज, दि.२० रोजी संपली. त्यामुळे शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी नव्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम आज जाहीर केला.
जिल्हा पारिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवड मंगळवार,३१ डिसेंबरला दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात होईल. तर पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडीचा कार्यक्रम दोन-तीन दिवसात जाहीर करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी दिली.
दरम्यान, या प्रक्रियेला किमान दहा दिवसांचा कालावधी जाणार असल्याने या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीवर प्रशासक नेमण्यात येणार असल्याची चर्चा होती.
मात्र,शासनाच्या निर्देशनानुसार जुन्याच पदाधिकार्यांना काळजीवाहू पदाधिकारी म्हणून नव्या निवडी होईपर्यंत काम पाहावे लागणार आहे.
जिल्हा प्रशासन जिल्हा परिषदेच्या ७२ सदस्यांना निवडणूक कार्यक्रमाच्या नोटीसा उद्या पाठविणार आहे.