ईस्ट लंडन : भारतीय युवा (१९ वर्षाखालील) संघाने दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात ९ विकेटनी विजय संपादित केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दिव्यांश सक्सेना सामनावीर ठरला.
#SAu19s | India U19s sealed a nine-wicket victory in the opening #YouthODI clash against the #SAu19s.
Divyaansh Saxena claimed the man of the match award for his unbeaten 86. #SAvIND #FutureStars pic.twitter.com/Wny4iTxSsS
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 26, 2019
विजयासाठीचे १८८ धावांचे लक्ष्य भारताने ४२.३ षटकांत १ बाद १९० धावा करत सहज पूर्ण केले. भारताकडून दिव्यांश सक्सेनाने नाबाद ८६ तर कुमार कुशाग्रने नाबाद ४३ धावा करत भारताच्या विजयावर शिक्केमोर्तब केलं. तिलक वर्माने ५९ धावांच महत्वपूर्ण योगदान दिलं.आफ्रिकेकडून क्लोएटने ४२ धावा देत १ गडी बाद केला.
#SAu19s | All out! Cloete is the last man to fall, bowled by Ankolekar for 3.
Luke Beaufort (64) top-scored for South Africa while India's Bishnoi claimed figures of 3/36.
IND need 188 runs to win. #SAvIND #FutureStars #YouthODI pic.twitter.com/b7x8XA5See
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 26, 2019
तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली होती. आफ्रिकेने ब्युफाॅर्टच्या ६४ आणि लीसच्या २७ धावांच्या जोरावर ४८.३ षटकांत सर्वबाद १८७ धावा केल्या होत्या. भारतीय गोलंदाजीत रवी बिश्नोईने ३६ धावा देत ३ तर कार्तिक त्यागीने २८ धावा देत २ गडी बाद केले.