मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Thought of the day 👇🏼 pic.twitter.com/PkLiHS3GVW
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 10, 2021
यावर आता देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरवर सुविचार ट्विट शेअर केले आहे. हा सुविचार जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा आहे. हा सुविचार अशा आशयाचा आहे की, ‘आपण डुकरासोबत कुस्ती खेळू नये, हे मी खूप पूर्वी शिकलोय. डुकरासोबतची कुस्ती आपल्याला घाण करते आणि तेच डुकराला आवडतं’
दरम्यान,मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांनी हे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये फडणवीस यांनी कुणाचेही नाव घेतले नाही. त्यामुळे, त्यांच्या या ट्विटचा निशाणा स्पष्टपणे नवाब मलिक यांच्याकडेच इशारा करत असल्याचे दिसून येते.
तत्पूर्वी, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुंडांना मोठ्या पदावर बसवलं, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. सोबतच बनावट नोटांचा खेळ फडणवीसांच्या आशीर्वादानं सुरु होता.
बनावट नोटांचं पाकिस्तानपर्यंत कनेक्शन आहे. जे खोट्या नोटांचं रॅकेट चालवत होते त्याला तत्कालिन फडणवीस सरकारचा पाठिंबा होता. आज सकाळी पत्रकार परिषद घेत मलिक यांनी फडणवीसांवर आरोप केले आहे