वाघोली (पुणे) – न्हावी सांडस (ता. हवेली) ग्रामपंचायतीवर हवेली तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष योगेश शितोळे यांनी आपल्या गटाचे पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळविले आहे. गेल्या 15 वर्षांपासून या ग्रामपंचायतीवर शितोळे गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे. यंदाही 9 पैकी 6 जागा मिळवून शितोळे हॅट्ट्रीक साधली आहे.
या निवडणुकीत श्रीनाथ साहेब ग्रामविकास पॅनलने योगेश शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवली होती. यामध्ये
वॉर्ड क्रमांक 1- अनामिका योगेश शितोळे, मोहन भिकाजी खाडे, बायडाबाई सदाशिव निकम.
वॉर्ड क्रमांक 3- नामदेव किसन शितोळे, रुपाली संदीप शितोळे, रोहिणी पांडूरंग शितोळे.
तर श्री भैरवनाथ परिवर्तन पॅनलने विपुल शितोळे यांच्या मार्गर्शनाखाली निवडणूक लढवली होती. यावेळी
वॉर्ड क्रमांक- 2- प्रज्ञा विपुल शितोळे, स्वाती जितेंद्र खाडे, कैलास शशिकांत बारगीर या तिन्ही जागांवर विजय मिळवला आहे.
योगेश शितोळे हे आमदार अशोक पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून तालुक्यात परिचित आहेत. न्हावी सांडस ग्रामपंचायतीवर योगेश शितोळे यांच्या गटाचे वर्चस्व कायम राहिल्याने अशोक पवार यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.