बंगळुरू – कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएएस येडियुरप्पा यांच्या गच्छंतीबाबतची वृत्तं अधूनमधून माध्यमांमध्ये झळकत असतात. मात्र असे असले तरी येडियुरप्पा यांनी आतापर्यंत तरी आपल्या पदावर गदा येऊ दिलेली नाहीये. अशातच आज त्यांनी, राज्यातील नेतृत्वबदलाबाबतच्या चर्चांबाबत मोठे विधान केले आहे.
“आजच्या घडीला तरी राज्यात नेतृत्वबदलासाठी कोणी पर्याय आहे, असं मला वाटत नाही. ज्या दिवशी भाजपच्या हायकमांडकडून मला आदेश मिळतील त्याच दिवशी मी माझ्या पदाचा राजीनामा देईल.” असं वक्तव्य येडियुरप्पा यांनी केलं आहे.
दरम्यान, राज्याचे महसूल मंत्री आर अशोक यांनी देखील राज्यातील नेतृत्वबदलाच्या चर्चा थांबवायला हव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.
ते म्हणाले, “बीएस येडियुरप्पा हे आमचे नेते आहेत आणि तेच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहतील. त्यामुळे राज्यातील नेतृत्वबदलाच्या चर्चा आता थांबवायला हव्यात”. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.
तत्पूर्वी, राज्यातील जेडी(एस) व काँग्रेसने निवडणुकांनंतर एकत्र येत एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या सरकारला अंतर्गत कलहामुळे पायउतार व्हावे लागले होते. मात्र, सरकार पाडण्यामागे येडियुरप्पा यांची खेळी असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. जेडी(एस)-काँग्रेस सरकार पडल्यानंतर येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजप सरकार स्थापन करण्यात आलं.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेतृत्वबदलाच्या चर्चांनी जोर धरला होता. या चर्चांना आता स्वतः मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि महसूल मंत्री आर अशोक यांनी पूर्णविराम दिला आहे.
I don’t feel there is no alternate leadership in BJP here. I will resign the day party high command asks me to quit: Karnataka Chief Minister BS Yediyurappa pic.twitter.com/ZzhxWiK7Tg
— ANI (@ANI) June 6, 2021