नवी दिल्ली :- केंद्राने आपल्या कर्मचाऱ्यांना तणावमुक्त करण्यासाठी, ताजेतवाने आणि कामावर अधिक फोकस करण्यासाठी अल्प कालावधीसाठी सरकारी कार्यालयातील खुर्चीवरच काही मिनीटे योगा करण्यास सांगितले आहे.
एका आदेशात, कार्मिक मंत्रालयाने केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांना/विभागांना कामाच्या ठिकाणी हा नवीन योग प्रोटोकॉल स्वीकारण्याची सुचना केली आहे. या कृतीला त्यांनी वाय-ब्रेक असे नाव दिले आहे. याचा अर्थ योगा ब्रेक असा असून तो काहीं मिनीटांसाठी असणार आहे. प्रोटोकॉलचा अभिप्राय खूप उत्साहवर्धक आहे. मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था, आयुष मंत्रालयाने हा उपक्रम सुरू केला आहे.
जे कर्मचारी आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे बाहेर जाऊन योगा करू शकत नाहीत त्यांना कार्यालयाचील खुर्चीवरच सोप्या स्वरूपाची आसने, प्राणायाम आणि ध्यान करण्याची सुचना करण्यात आली आहे.
वाय-ब्रेक हे तंत्र हे प्रख्यात तज्ञांनी अभ्यासपुर्वक तयार केले आहे. तो कसा करायचा याचे चार व्हिडीओही जारी करण्यात आले आहेत.