WPL Live Cricket Score, GG vs UPW Women’s Premier League 2024 : महिला प्रीमियर लीगच्या पाच संघांमधील प्लेऑफची लढत सुरू झाली आहे. मुंबई आणि दिल्ली प्लेऑफमध्ये पोहोचले असून, आता लढत तिसऱ्या स्थानासाठी आहे. आरसीबी, यूपी आणि गुजरात यांच्यात स्पर्धा आहे. महिला प्रीमियर लीग 2024 चा 18 वा सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळला जात आहे.
महिला प्रीमियर लीगच्या 18 व्या सामन्यात गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 152 धावा करताना यूपीसमोर 153 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. कर्णधार बेथ मुनीने नाबाद अर्धशतक झळकावले. तिने 52 चेंडूत 10 चौकार अन् 1 षटकारासह सर्वाधिक 74 धावा केल्या.
Innings Break ‼@Giant_Cricket set a target of 153 🎯 for @UPWarriorz
Will #UPW successfully chase this down? 🤔#TATAWPL | #GGvUPW pic.twitter.com/xNplNIZxbn
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 11, 2024
या स्टार फलंदाजाने लॉरासोबत पहिल्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. 24 वर्षीय दक्षिण आफ्रिकेची फलंदाज आठव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर 43 धावा काढून बाद झाली. त्यानंतर दयालन हेमलता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आली आणि खाते न उघडताच बाद झाली.
नवव्या षटकानंतर यूपीविरुद्ध गुजरातची फलंदाजी ढासळली. फोबी चार, ॲश्ले गार्डनर 15, भारती फुलमाली एक, कॅथरीन ब्राइस 11 आणि तनुजा एक धाव करू शकली. तर, मेघना सिंग खाते न उघडता कर्णधार मुनीसह नाबाद राहिली.
यूपीकडून गोलंदाजीत सोफीने तीन तर दीप्तीने दोन विकेट घेतल्या. याशिवाय राजेश्वरी गायकवाड व चामरी अटापट्टू यांना प्रत्येकी एक यश मिळाले.