WPL Live Cricket Score, GG vs DC Women’s Premier League 2024 : आज एम चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा दहावा सामना खेळला जात आहे.
महिला प्रीमियर लीग 2024 च्या 10 व्या सामन्यात, कर्णधार मेग लॅनिंगच्या अर्धशतकाच्या बळावर गुजरात जायंट्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 8 गडी गमावून 163 धावा केल्या आहेत. या सामन्यात गुजरातच्या क्षेत्ररक्षकांनी बरेच झेल सोडले.
Innings Break!
Delhi Capitals post 163/8 in the first innings.
A crucial chase coming up for the Gujarat Giants! Can they clinch a win tonight?
Live 💻📱https://t.co/9MIuaZmvo8#TATAWPL | #GGvDC pic.twitter.com/VJcMdPVksv
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 3, 2024
दिल्लीकडून मेग लॅनिंगने सर्वाधिक धावा केल्या. तिने 41 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 55 धावा केल्या. ॲलिस कॅप्सीने 17 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 27 धावांचे योगदान दिले. ॲनाबेल सदरलँडने 12 चेंडूंत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 20 धावा केल्या.
गुजरातकडून गोलंदाजीत मेघना सिंगने सर्वाधिक 4 बळी घेतले. ऍशले गार्डनरने 2 बळी घेतले. तनुजा कंवर आणि मन्नत कश्यप यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.