पुणे -निलंबित लाचखोर अधिकारी डॉ. अनिल रामोड याला पुणे विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदी एक वर्षाची मुदतवाढ देण्याची मागणी महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमत्र्यांकडे दि.1 जून रोजी पत्राद्वारे केली होती. हे पत्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी ट्विटरवर जाहीर केले आहे. “वा रे व्वा विखे पाटील’ असे म्हणत हे पत्र त्यांनी ट्विट करीत विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
व्वा रे व्वा विखे पाटील!
पुणे येथे आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड हा 8 लाख रुपये लाच घेतल्यामुळे सीबीआयने अटक केल्यावर सध्या कारागृहात आहे. परंतु या प्रकरणात महसूलमंत्री राधाकृष्ण विखेचे नाव समोर आले आहे, त्या मंत्र्याने रामोड याची बदली पुण्यावरुन करु नये, यासाठी शिफारस पत्र… pic.twitter.com/SKebYp0m69
— Ambadas Danve (@iambadasdanve) June 25, 2023
दानवे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पुणे येथे आयएएस अधिकारी डॉ. रामोड हा 8 लाख रुपये लाच प्रकरणी सीबीआयने अटक केल्यावर सध्या कारागृहात आहे. रामोड याची बदली पुण्यातून, यासाठी शिफारस पत्र महसुलमंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. रामोड पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्तपदी होता. त्याला याच पदावर मुदत वाढ मिळावी, असे पत्र विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते.आता विखे पाटील या पत्रावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.