पुणे -महिलांच्या अ गटातून केनिया तर ब गटातून भारताने सहाव्या विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुषांच्या अ गटातून भारताने, ब गटातून केनियाने, क गटातून बेलारूसने तर ड गटातून सेनेगल संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्टेडियम येथे सुरु असलेल्या स्पर्धेत पुरुष गटात भारतीय संघाने आर्जेन्टिना संघाला 9-1 असे पराभूत करताना स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
मध्यंतराला भारताने 4-0 अशी आघाडी घेताना लढतीवर वर्चस्व मिळविले होते. आकाश गणेशवाडे (4.40, 15.15, 36.30) व श्रीकांत साहू (12.27, 26.02, 30.07 ) यांनी प्रत्येकी 3 , हर्षल घुगेने 2 (17.25, 21.27) तर आदित्य सुतारने 1 (28.55) गोल करताना संघाला विजय मिळवून दिला. आर्जेन्टिना संघाकडून इमिलानो जेससने (32.10) एक गोल केला.
महिला विभागातून भारताने सियारा लीवोन संघाला 9-0 असे पराभूत करताना ब गटातून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. मध्यंतराला 5-0 अशी आघाडी घेतली होती. इशिका शर्मा (0.50, 16.22), कर्णधार एस. सुस्मिथा (18.35, 22.55 ), श्रुती भगत (19.30,29.40) यांनी प्रत्येकी 2 तर देवांशी पटेल (32.50), पूजा चौधरी (13.15) व खुशी वानखेडे (25.00) यांनी प्रत्येकी 1 गोल केला. सियारा लीवोन संघाकडून एकाही खेळाडूला गोल करता आला नाही.