नवी दिल्ली -भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 10 शहरांमध्ये विश्वकरंडकाचे 48 सामने होणार आहेत. स्पर्धेपूर्वी सर्व स्टेडियमच्या पायाभूत सुविधा अद्ययावत केल्या जाणार आहेत.
यासाठी भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) 500 कोटी रुपये खर्च करणार असून, 50-50 कोटी रुपये सर्व 10 स्टेडियम्सना वितरित केले जाणार आहेत.
यामध्ये, मुंबईत नवीन फ्लडलाइट्स आणि कॉर्पोरेट बॉक्स बसवले जातील तसेच लखनौ आणि चेन्नईमध्ये नवीन पिच बनवले जाणार आहेत.
यासह कोलकात्यात ड्रेसिंग रूम अपग्रेड करण्यासह धर्मशाळेत गवताचे आउटफिल्ड आयात केले जाईल, पुण्यात नवीन छप्पर बसवले जाईल आणि दिल्लीतील जीर्ण शौचालये सुधारली जाणार आहेत.