शिक्रापूर- करोनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांनी कंपनीमध्ये काम करीत असताना स्वतःची जास्तीत जास्त काळजी घेत आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे आवाहन कामगार नेते यशवंत भोसले यांनी केले आहे. सणसवाडी (ता. शिरूर) औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांमध्ये कामगारांशी संवाद साधण्यासाठी भोसले यांनी नुकतीच कामगारांची भेट घेतली.
यावेळी सुविधा व आरोग्याविषयी माहिती घेत कामगारांची विचारपूस केली. यावेळी यशवंत भोसले यांनी कंपनी व्यवस्थापकाने कामगार कपात व पगार कपात करू नये, अशा सूचना कंपनी व्यवस्थापकांना दिल्या आहे.यावेळी कंपनीचे व्यवस्थापक मकरंद पानसकर, सूरज सोनवणे, कामगार मधुकर भुजबळ, अभय चव्हाण, सोमनाथ गायकवाड, अमोल कुंभार, अजित भुजबळ, अनिल दौंडकर, संदीप इंगवले, निलेश खैरे आदी उपस्थित होते,