चिंचवड, (वार्ताहर) – प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘स्टुडंट्स वेलफेअर कमिटी अंतर्गत’ अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनींना महत्त्वाचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रमुख वक्त्या महिला समस्या अभ्यासक सोनाली गांधी यांनी मुलींना योग्य असे अंतरवस्त्र वापरण्याबाबत मार्गदर्शन केले. महिलांच्या अनेक वाढत्या समस्या व त्याची कारणेही सांगितली.
स्त्रीच्या जीवन प्रवासात अनेक बदल होत असतात. हार्मोन्स बदल होत असतात. त्यामुळे मुलींनी बालिका व कुमारवयापासून स्वतःची काळजी घेतली पाहिले. त्यासाठी अंतरवस्त्रपासून सुरुवात करावी अनेक मुलींना माहीत नसते अंतरवस्त्र कसे कोणते वापरावे.
योग्य पद्धतीचे अंतरवस्त्र वापरल्यास स्त्रियांचे अनेक आजार टाळू शकतो. असे त्यांनी सांगितले.तसेच प्रश्नोत्तराच्या स्वरूपात मुलींशी संवाद साधून अनेक समस्यांवर उपायही सांगितले. उपप्रचार्या डॉ. वनिता कुर्हाडे, समनवयिका प्रा. जसमीन फरास, प्रा. वैशाली देशपांडे तसेच सर्व महिला प्राध्यापिका उपस्थित होत्या.