आळंदी – आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रायणी नदीच्या पाण्यातून एका अनोळखी महिलेस बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढण्यात आले. पुढील उपचारास पिंपरी येथील चव्हाण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेस उपचारापूर्वीच मयत घोषित केले. तर आळंदी पोलीस ठाण्यात अकस्मित मयत अशी नोंद केली आहे.
या घटनेची खबर रमेश शिंदे (वय 56, रा, आळंदी) यांनी दिली. मयत महिलेच्या वर्णन पुढीलप्रमाणे वय : अंदाजे वय 55 ते 60 वर्षे, अंगावर गुलाबी रंगाची साडी, त्यावर फुलांची डीझाईन असे कपडे आहेत. पोलीस हवालदार मुकणे पुढील तपास करीत आहेत.