हेडफोन घालून रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या महिलेला चिरडले; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप

मुंबई – सध्या मोबाईल जीवनावश्यक वस्तूपैकी एक वस्तू होऊन बसला आहे. केवळ संभाषण नव्हे तर गाणे ऐकण्यासाठी मोबाईला अधिक उपयोग होतो. त्यासाठी अत्याधुनिक हेडफोन बाजारात आले आहेत. मात्र हेच हेडफोन रस्त्याने  चालताना वापरणे किती जीवघेणे ठरते हे एका घटनेतून समोर आले आहे. होशंगाबाद येथे ही घटना घडली आहे.

होशंगाबाद येथे रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेखाली येऊन महिला ठार झाली. वास्तविक पाहता रेल्वे येणार असल्याने गेट बंद करण्यात आले होते. मात्र महिला गेटच्या खालून रेल्वे रूळ क्रॉस करण्यासाठी आली होती. महिलेच्या हातात एक पिशवी होती आणि कानात हेडफोन घातलेले होते. त्यामुळे महिलेला रेल्वेचा आवाज आला नाही.

महिला एकाच दिशेने पाहत चालत होती. तिने दोन ट्रॅक क्रॉसही केले होते. तिच्यामते या बाजूने रेल्वे येईल. मात्र तिसऱ्या ट्रॅकवरून रेल्वे येत असल्याचं महिलेला कळलं ही नाही. यावेळी रेल्वेने अनेकदा हॉर्न दिले. तर दोन्ही बाजुला असलेल्या लोकांनी महिलेला रेल्वे येत असल्याचा इशाराही केला. मात्र हेडफोनमुळे महिलेचे लक्ष नव्हते. त्याचवेळी महिलेला ट्रेन येताना दिसली. त्यावर तिला वाटले आपण सहज ट्रॅक कॉस करू, मात्र तिचा अंदाज चुकला आणि भरधाव येणाऱ्या रेल्वेने तिला चिरडले.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधून गेट बंद असताना रेल्वे ट्रॅक पार करणे किती धोकादायक असल्याचे समजते. तसेच रस्त्याने चालताना हेडफोन घालणे किती जीवघेणे असल्याचे दिसून येते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.