पुणे, दि. 2 -विवाह संकेतस्थळावर खोटी माहिती टाकून विवाह इच्छुकाची सुमारे तब्बल 9 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केली. या महिलेला कोरेगाव पार्क पोलिसांनी गोवा येथून अटक केली. तिला 4 एप्रिलपर्यंत तिला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बिराजदार यांनी दिला आहे.