मंचर – येथे धना पीक असलेल्या शेतात ट्रॅक्टरने नांगरू नये, असे म्हटल्याचा राग येऊन 39 वर्षीय महिलेला अश्लील भाषेत शिविगाळ करून विनयंभग केल्याप्रकरणी एकाच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिली.
मंचर हद्दीतील मुळेवाडी येथे 39 वर्षीय फिर्यादी महिला तिच्या घरासमोर उभी असताना मयूर लक्ष्मण पाचपुते याने टॅक्टरने फिर्यादी महिलेच्या मालकी क्षेत्रात पेरलेले धना कोथिंबीर पीक टॅक्टरने नांगरले. यावेळी या महिलेने टॅक्टरने नांगरण्यास मनाई केल्याने मयुर
पाचपुते याने या महिलेला अश्लील भाषेत शिविगाळ करून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. संबधित महिलेने पाचपुते याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस जवान नंदकुमार घोडे करीत आहेत.