विम्बल्डन टेनिस स्पर्धा : पहिल्याच फेरीत गुणेश्‍वरनची हार

विम्बल्डन : भारताच्या प्रग्येन गुणेश्‍वरन याला पहिल्या फेरीत पराभवास सामोरे जावे लागले. गुणेश्‍वरन याच्यापुढे मिलोस राओनिक याचे आव्हान होते. त्यामुळे त्याचा निभाव लागणे कठीण होते. हा सामना त्याने 6-7 (1-7), 4-6, 2-6 असा गमाविला. त्याची ही पहिलीच विम्बल्डन स्पर्धा होती.

गुणेश्‍वरन हा पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या डेव्हिस लढतीत भाग घेणार आहे. तो म्हणाला की, या लढतीमुळे मला एटीपी स्पर्धेत भाग घेण्याच्या संधीवर पाणी सोडावे लागणार आहे. मात्र देशासाठी तो त्याग करायची माझी तयारी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.