बॅंक फ्रॉड प्रकरणात सीबीआयची व्यापक कारवाई

14 प्रकरणात देशभरात 50 ठिकाणी छापे

नवी दिल्ली – सीबीआयने बॅंक फसवणूकीच्या एकूण 14 प्रकरणात देशभरात एकाचवेळी 50 ठिकाणी छापे टाकून शोधमोहीम हाती घेतली आहे. देशातील 18 शहरांमध्ये एकाचवेळी हे छापे घातले जात आहेत. विविध कंपन्यांनी बॅंक अधिकाऱ्यांशी संगनमताने ही फसवणूक केल्याची प्रकरणे घडली असून या प्रकरणात एकूण 640 कोटी रूपयांची रक्‍कम गुंतली आहे अशी माहिती संबंधीत सूत्रांनी दिली.

दिल्ली, मुंबई, लुधियाना, ठाणे, वलसाड, पलानी, गया, पुणे, गुरगाव, चंदीगड, भोपाळ, सुरत, कोलार इत्यादी ठिकाणी ही कारवाई केली जात आहे. विविध कंपन्यांचे संचालक, प्रमोटर्स, आणि बॅंक अधिकाऱ्यांवर हे छापे घातले जात आहेत, या फसवणूक प्रकरणात एकूण चौदा गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. छाप्यांमध्ये नेमका काय तपशील हाती लागला आहे हे मात्र अजून समजू शकलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.