पुणे : भारताचा टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरनला महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीच्या दुस-या फेरीतच पराभवला सामोरं जावे लागले. त्याच्या या पराभवासह एकेरीतील भारताचे आव्हानही संपुष्टात आले.
SEE YOU IN THE QUARTERS, SOON! 😌
Soonwoo Kwon kept his cool and cruised 6-3, 7-6 past 🇮🇳's Prajnesh Gunneswaran.#TOM2020 #AdvantagePune #ATPTour #TataOpenMaharashtra pic.twitter.com/Itq9o97lKF
— Tata Open Maharashtra (@MaharashtraOpen) February 6, 2020
दुस-या फेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या सूनवू क्वोनने प्रज्ञेशचा ६-३, ७-६(५) असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत प्रज्ञेश १२२ व्या तर सूनवू क्वोन ८८ व्या क्रमांकावर आहे. यापूर्वी दोघेही चार वेळा आमनेसामने आले होते. त्यात तीनवेळा प्रज्ञेशने तर एक वेळा क्वोनने विजय मिळवला होता.
दरम्यान, पहिल्या फेरीत प्रज्ञेशने जर्मनीच्या यानिक मेडेनचा ७-६(७-४), ७-६(७-५) असा पराभव करत आगेकूच केली होती.