लंडन – विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत बुधवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत रुमानियाची स्टार खेळाडू सिमोन हालेपने अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोवाचा 6-2, 6-4 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. अन्य सामन्यात कझाकिस्तानच्या एलिना रायबान्काने क्रोएशियाच्या अज्ला तोमजानोवीकवर 4-6, 6-2, 6-3 असा विजय मिळवला व उपांत्य फेरीत प्रवेश केला.
ट्युनिशियाच्या ओन्स जेबुरने थाटात विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तीने मेरी बुझकोव्हावर 3-6, 6-1, 6-1 अशी मात केली. या लढतीत जेबुरने पहिला सेट गमावल्यावरही थाटात पुरागमन केले व नंतरचे दोन्ही सेटसह सामनाही जिंकला. आता या फेरीत तीची लढत जर्मनीच्या तात्जना मारियाशी होणार आहे.