लंडन – ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धांमधील सर्वात मानाच्या समजल्या जात असलेल्या लिम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज (शनिवार,दि.8) सांयकाळी 6.30 वाजता महिला एकेरीची अंतिम लढत होणार आहे. या स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाचे विजेतेपद पटकावण्यासाठी कझाकस्तानची एलेना रायबान्का व ट्युनिशियाची ओन्स जेबुर यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. या दोघींनी पहिल्यांदाच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
जागतिक टेनिसमध्ये तिसरे मानांकन असलेली जेबुर यंदाच्या स्पर्धेत अफलातून फॉर्ममध्ये होती. तिने उपांत्य लढतीत जर्मनीच्या तात्जना मारियाचा 6-2, 3-6, 6-1 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.
जागतिक टेनिस क्रमवारीत 17 व्या मानांकित रायबान्काने स्पर्धेतील सर्वात सनसनाटी निकाल देताना ही स्पर्धा 2019 साली जिंकलेल्या व यंदाच्या स्पर्धेची संभाव्य विजेती मानली जात असलेल्या सिमोन हालेपवर 6-3, 6-3 अशी मात केली. आता रायबान्काला कारकिर्दीतील तिसरे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद मिळवण्याची संधी आहे.