वडूज, (प्रतिनिधी)- शहरातील वाहतूक समस्या व पोलिसांच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी हमी वडूज पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरिक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार विभागाचे राज्य चिटणीस सूरज लोहार व मित्र परिवाराच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सचिन खुडे, रोहित लोहार, विशाल गोडसे, तुषार लोहार, मन्सूर खोत, आदिनाथ दुबळे, हिम्मत पाटोळे, गणेश खुडे, उस्मान सय्यद, पवन नागावकर, मंगेश पवार, संतोष देशमुख आदींसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. सोनवणे म्हणाले, समाजात कोणाचीही भावना दुखावेल अशा पोस्ट करू नयेत.
सोशल मीडियाचा चांगल्या गोष्टींसाठी करावा. सध्या खटाव तालुक्यातील शाळा, महाविद्यालयाच्याठिकाणी निर्भया पथकाची गस्त घालण्याची गरज आहे. तसेच काही ठिकाणी सुसाट वेगाने दुचाकी पळवण्याचे प्रकार घडतात, अशा प्रवृत्तींना आळा घालण्यात यावा, असे सूरज लोहार यंनी सांगितले.
फोटो ओळी :