खंडाळा, (प्रतिनिधी)- सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, यासाठी आग्रही भूमिका घेणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याची माहिती जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्यामुळे शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे. पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेसाठी जिल्ह्यातील सकारात्मक वातावरण आणि पदाधिकारी, शिवसैनिकांनी केलेल्या निर्धाराबाबत सविस्तर चर्चा केली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या ‘अभी नही तो कभी नही’ च्या आग्रही भूमिकेचे मुख्यमंत्र्यांनी समर्थन करीत साताऱ्याची जागा आपण लढवू, या जागेसाठी आपण आग्रही राहणार असल्याचे स्पष्ट केले.