Entertainment news – दाक्षिणात्य ते बॉलीवूडपर्यंत आपले दमदार अभिनय कौशल्य सिद्ध करणारी पूजा हेगडे ( pooja hegde ) ही मनोरंजन उद्योगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. पूजाने 2014 मध्ये हृतिक रोशनसोबत मोहेंजोदारो या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिनेत्री पूजा शेवटची सलमान खानसोबत ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसली होती.
सध्या पूजा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. पूजा लवकरच लग्न करणार असल्याचा दावा मिडीया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, पूजा हेगडे मुंबईस्थित क्रिकेटरसोबत लग्न करणार आहे. मात्र या संदर्भात अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पूजाचे नाव क्रिकेटपटूशी जोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी पुजा हेगडे कर्नाटकातील एका क्रिकेटरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. मात्र, पूजाने या सर्व अफवा फेटाळून लावल्या होत्या.
‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान सलमान खान आणि पूजा हेगडे ( pooja hegde ) यांच्या डेटिंगच्या अफवाही चर्चेत आल्या होत्या. अशा अफवांना वेग आला जेव्हा चित्रपट समीक्षक उमेर संधूने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर दावा केला की दोघे प्रेमात पडले आहेत. समीक्षकाने असेही म्हटले की अभिनेत्याच्या जवळच्या स्त्रोताने पुष्टी केली की दोघे डेटिंग करत होते.
पूजा हेगडे आणि सलमान खान यांच्यातील नात्याच्या अफवांना पुन्हा एकदा उधाण आले जेव्हा सुपरस्टार सलमान खान पूजा हेगडेच्या भावाच्या लग्नाला हजर होता. पूजाच्या भावाच्या लग्नातील सुपरस्टारचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आणि त्यांच्या नात्याच्या अफवांना जोर आला. सोशल मीडियावर सलमान खानसोबत डेटिंगच्या अफवांवर पूजाने प्रतिक्रिया दिली होती. मीडियाला दिलेल्या मुलाखतीत पूजा हेगडे ( pooja hegde ) म्हणाली की,’ती सिंगल आहे आणि तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.’ pooja hegde marriage cricketer