मुंबई – बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर हा अभिनेत्री मलायका अरोरासोबत रिलेशनमध्ये आहे. बॉलिवूडमधील हे कपल कायम चर्चेत असते. ते दोघं लग्न करणार असल्याच्या अफवाही अनेकदा उठल्या आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ते दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. नुकतंच मलायकाने तिच्या आणि अर्जुनच्या लग्नाबद्दलचा खुलासा केला आहे.
दरम्यान, मलायका अरोराने नुकतंच अर्जुनसोबतच्या लग्नाबद्दलचा खुलासा केला आहे तिने एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगतले आहे. लग्नाच्या चर्चांवर ती म्हणाली,“येत्या काळात आम्हाला एकत्र राहायचे आहे, ही गोष्ट आम्हाला माहिती आहे. आता आमचं नातं कुठल्या टप्प्यात आहे आणि या पुढे आम्हाला काय करायचे याची आम्हाला माहिती आहे.’
“आम्ही दोघेही आता मॅच्युअर आहोत. हे नाते कुठपर्यंत असेल हे पाहण्यासाठी मी फार उत्सुक आहेत. आम्ही दोघेही हसत, मजा मस्ती करत असलो तरीही आम्ही या नात्याबद्दल फार गंभीर आहोत.” असेही मलायका म्हणाली.
दरम्यान, मलाका अरोराने असेही सांगितले जेव्हा आम्ही एकत्र असतो तेव्हा मी फक्त सकारात्मक असते. आम्ही एकमेकांवर आणि आयुष्यावर प्रेम करणार आहोत आणि मी त्याला सांगतो की मला तुझ्याबरोबर म्हातारे व्हायचे आहे. असे म्हणत मालयकाने लग्नाच्या चर्चांवर उत्तर दिले आहे.