Allu Arjun Viral Photo| दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाच्या यशानंतर आता चाहते ‘पुष्पा 2’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरने देखील साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाचा टीझरही नुकताच प्रदर्शित करण्यात आला, जो प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यानंतर सोशल मीडियावर अल्लू अर्जुनचा एक फोटो व्हायरल होत आहे. यातील त्याच्या साधेपणाने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहे.
व्हायरल फोटोत अल्लू अर्जून पत्नी स्नेहा रेड्डीसह एका ढाब्यात बसलेला दिसत आहे. अल्लू अर्जुन हा फोनवर बोलताना पाहायला मिळतोय, तर स्नेहा ही जेवताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त अल्लू अर्जूनचीच चर्चा होतीये, जो त्याचा स्टारडम विसरुन थेट ढाब्यावर पोहचला. Allu Arjun Viral Photo|
#AlluArjun
was spotted dining at a dabba with his wife ❤️ #Pushpa2TheRule pic.twitter.com/iC4ZY8h59C— @Mani💘Nani💥AA (@N17780603Nani) May 21, 2024
सुप्रसिद्ध अभिनेता असूनही अल्लू अर्जुन 5 स्टार हॉटेलमध्ये जाण्याऐवजी नॉन-एसी रेस्टॉरंटमध्ये पत्नीसोबत जेवणाचा आनंद घेत आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्याचा साधेपणा पाहून त्याचे चाहते त्याचे कौतुक करत आहेत. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अल्लू अर्जुनचा हा साधेपणा पहिल्यांदा दिसला नसून अनेकदा पाहायला मिळाला आहे. यापूर्वी तो एका छोट्या दुकानात डोसा खाताना दिसला होता. सुपरस्टार असूनही त्याचा हाच साधेपणा चाहत्यांच्या पसंतीस पडतो. Allu Arjun Viral Photo|
दरम्यान, दिग्दर्शक सुकुमार यांच्या ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटानंतर अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल या सुपरहिट चित्रपट ‘पुष्पा 2: द रुल’च्या सिक्वेलमध्ये त्यांच्या भूमिकांची पुनरावृत्ती करताना दिसणार आहेत. ‘पुष्पा 2’ आता जागतिक बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करण्यासाठी सज्ज होणार आहे.
हेही वाचा:
रवीना टंडनने सांगितलं साऊथ आणि बॉलीवूड इंडस्ट्रीमधील सर्वात मोठा फरक