मुंबई – बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. जगभरात या चित्रपटाने मोठी कमाई केली. पठाणच्या यशानंतर शाहरुखच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. ‘डंकी’ आणि ‘जवान’ हे त्याचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र ‘जवान’ चित्रपटाची तारीख बदलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे.
‘जवान’ हा चित्रपट 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली होती. मात्र आता निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. काही दिवस शिल्लक असताना चित्रपटाचे प्रमोशनही अद्याप सुरू झालेले नाही. या चित्रपटाच्या व्हीएफएक्सचं काम अजून शिल्लक आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी या चित्रपट रिलीज होण्यासाठी काही वेळ लागणार आहे. यामुळे हा सिनेमा जूनमध्ये प्रदर्शित होणार नाही. हा चित्रपटात आता ऑगस्टमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत चित्रपटाच्या टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
View this post on Instagram
दरम्यान, ‘जवान’मधील शाहरुखचा लुक अनेकांच्या पसंतीस पडला होता. हा एक अॅक्शन-थ्रिलर चित्रपट असून यात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारासह अभिनेता विजय सेतुपती देखील दिसणार आहे. तर या चित्रपटात दीपिका पदुकोण कॅमिओ करणार आहे.