चीन मधील मुस्लिमांच्या स्थितीबद्दल इम्रान खान गप्प का?

अमेरिकेच्या दक्षिण – मध्य आशिया विभागाच्या सहाय्यक सचिवांचा सवाल

न्युयॉर्क- चीनने लाखो उइगर आणि टर्की भाषिक मुस्लिमांना आपल्या ताब्यात ठेवले आहे. त्याबद्दल इम्रान खान का बोलत नाहीत? असा सवाल अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशियाचे विभागाचे सहाय्यक सचिव एलिस वेल्स यांनी विचारला आहे. त्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणावर टीका केली आहे.

पाकिस्तानला काश्‍मीरमधल्या मुस्लिमांच्या स्थितीबद्दल जितकी चिंता वाटते तितकीच कळकळ त्यांनी चीनच्या ताब्यात असलेल्या मुस्लिमांच्या स्थितीबद्दलही दाखवावी असे अमेरिकेने म्हटले आहे. यावेळी पुढे बोलताना वेल्स म्हणाल्या की, पाकिस्तानला काश्‍मीर इतकीच पश्‍चिम चीनमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या मुस्लिमांबद्दल चिंता वाटली पाहिजे असे वेल्स यांनी म्हटले आहे. जम्मू-काश्‍मीरमधून कलम 370 हटवण्यावरुन तसेच मुस्लिमांच्या स्थितीवरुन पाकिस्तानने भारताविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. एलिस वेल्स यांनी पाकिस्तानला विचारलेल्या प्रश्नामुळे त्यांचा दुटप्पीपणा उघड झाला आहे.

चीन मधल्या मुस्लिमांच्या स्थितीवरुन पाकिस्तानने नेहमीच मौन बाळगले आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांना याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर ते आपल्या देशात भरपूर काही सुरु आहे असे सांगून उत्तर देण्याचे टाळतात. सोमवारी थिंक टॅंकच्या कार्यक्रमात इम्रान खान यांना उइगर मुस्लिमांच्या अवस्थेबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी थेट भूमिका घेण्याचे टाळले. पाकिस्तानचे चीन बरोबर खास संबंध आहेत. त्यांच्याबरोबर खासगीमध्ये हा विषय उपस्थित करु असे सांगून इम्रान यांनी उत्तर देण्याचे टाळले. चीनमधल्या अल्पसंख्यांकांच्या स्थितीवरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा निषेध करण्यात आला आहे. चीनने अनधिकृतपणे आपल्या देशातील मुस्लिमांना ताब्यात ठेवले आहे. पण चीनला हा आरोप मान्य नाही. तिथे आम्ही रोजगाराभिमुख प्रशिक्षण देतो असे चीनचा दावा आहे.

हफिझ सइद, मसूद अझरच्या विरोधात खटला चालवा

अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशियाचे विभागाचे सहाय्यक सचिव एलिस वेल्सयांनी पाकिस्तानला हफीझ सइद आणि मसूद अझरच्या विरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तानला जर भारत आणि त्यांच्यातील तणाव कमी करायचा असेल तर दहशतवाद्यांवर कारवाई करावी लागेल. अथवा अशा दहशतवाद्यांवर कारवाई नाही केली तर दोन्ही देशांमधील तणाव कधीच निवळणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.