Naveen-Ul-Haq International league T20 Ban : नवीन उल हक याला मोठा धक्का बसला आहे. इंटरनॅशनल लीग T20 ने अफगाणिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज नवीन उल हकवर कराराचे उल्लंघन केल्याप्रकरणी 20 महिन्यांची बंदी घातली आहे. नवीन शाहजाह आंतरराष्ट्रीय लीग T20 मध्ये वॉरियर्स संघाचा एक भाग होता, ज्यासोबत त्याने कराराचे उल्लंघन केले. नवीन आंतरराष्ट्रीय लीग टी-20 च्या (International league T20) पहिल्या सत्रात खेळताना दिसला होता, मात्र आता लीगने त्याच्यावर 20 महिन्यांची बंदी घातली आहे.
पहिल्या सत्रात नवीनने शारजाह वॉरियर्ससाठी 9 सामन्यात 24.36 च्या सरासरीने 11 विकेट घेतल्या होत्या. फ्रँचायझीने नवीनसोबत एक वर्षाचा करार केला होता, जो संघाला वाढवायचा होता, पण नवीनने नकार दिला. नवीनचा हा नकार त्याला बंदीच्या दिशेने घेऊन गेला. कॉन्ट्रेक्ट एग्रीमेंट (करार नामा) मुळे नवीन उल हकवर बंदी घालण्यात आली आहे. इंटरनॅशनल लीग टी-20 (ILT20) ने नवीन उल हक आणि शारजाह वॉरियर्स यांची बाजू ऐकून घेतली आणि त्यानंतर बंदीचा निर्णय घेण्यात आला.
वर्ल्डकपनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती…
अलीकडेच, 2023 मध्ये भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर नवीनने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला होता. मात्र, नवीनने विश्वचषकापूर्वीच स्पष्ट केले होते की, तो या स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. वनडेला अलविदा करण्यामागचे कारण देताना नवीनने सांगितले होते की, त्याला फक्त टी-20 क्रिकेट खेळायचे आहे.
Year Ender 2023 : रोहित शर्मासाठी 2023 वर्ष ठरले अनलकी! तीन वेळा हिटमॅन ठरला अपयशी…
नवीन उल हक आंतरराष्ट्रीय कारकीर्द…
नवीन अफगाणिस्तानसाठी एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला. त्याने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला आहे, परंतु आंतरराष्ट्रीय टी-20 खेळत आहे. अफगाणिस्तानच्या या वेगवान गोलंदाजाने आपल्या कारकिर्दीत 15 एकदिवसीय सामने खेळले. याशिवाय त्याने 27 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 32.18 च्या सरासरीने 22 विकेट घेतल्या. याशिवाय त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 20.70 च्या सरासरीने 34 विकेट्स घेतल्या आहेत.