World Cup 2023 India vs Afghanistan Match : दिल्लीत झालेल्या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा 8 विकेटने पराभव केला. विश्वचषक 2023 च्या 9व्या सामन्यात भारताने चमकदार कामगिरी केली. या सामन्यात रोहित शर्माने शतक झळकावले. तर विराट कोहलीने नाबाद अर्धशतक झळकावले. सामन्यादरम्यान कोहली आणि नवीन उल हकच्या (Virat Kohli and Naveen-ul-Haq) चाहत्यांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. अफगाणिस्तानच्या वाजमा अयुबीने (Wazhma Ayoubi) कोहली आणि नवीनच्या चाहत्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
वास्तविक वाजमा अयुबी ही अफगाणिस्तानची आहे. पण ती टीम इंडियाचीही फॅन आहे. 2023 च्या आशिया चषक दरम्यान तिनं भारतीय क्रिकेट संघासाठी अनेक पोस्ट केल्या होत्या. दिल्लीत खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान वाजमा अयुबी हिने एक्स (ट्विटर) वर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Delhi hai Dilwalo ki. King @imVkohli is asking his fans to stop the fan war on @imnaveenulhaq. Later, they shake hands and hug each other. To all those asking why the king is my favorite Indian player, what a gesture! 👏🏻🇮🇳🤝🇦🇫 pic.twitter.com/kJrCrQUMQp
— Wazhma Ayoubi 🇦🇫 (@WazhmaAyoubi) October 11, 2023
वाजमा अयुबी हिने व्हिडीओसोबत लिहिले आहे की, “दिल्ली है दिलवालो की.” किंग विराट कोहलीने त्याच्या चाहत्यांना नवीन उल हकच्या चाहत्यांशी सुरू असलेले युद्ध(वाद) थांबवण्यास सांगितले. नंतर दोघांनी हस्तांदोलन करून एकमेकांना मिठी मारली. जे मला विचारतात की , किंग विराट कोहली माझा आवडता का आहे, त्याच्यासाठी हा व्हिडीओ आणि पोस्ट आहे. वाह काय gestur आहे.” Delhi hai Dilwalo ki. King Virat kohli is asking his fans to stop the fan war on naveen-ul-haq. Later, they shake hands and hug each other. To all those asking why the king kohli is my favorite Indian player, what a gesture! वाजमा अयुबीने हिने विराट कोहलीला आपला आवडता खेळाडू म्हटले आहे. त्यामुळे नवीन उल हकच्या चाहत्यांना हे वाईट वाटू शकते.
आम्ही तुम्हाला सांगतो की, इंडियन प्रीमियर लीग 2023 दरम्यान कोहली आणि नवीन यांच्यात वाद झाला होता. या प्रकरणानंतर नवीनला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. दिल्लीत खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान कोहलीच्या चाहत्यांनी पुन्हा नवीनला मैदानावर ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोहलीने चाहत्यांना यापासून रोखले.