लंडन – ब्रिटनमध्ये खोकल्याची साथ झपाट्याने पसरायला लागली आहे. अलिकडच्या काळात दीर्घकाळच्या खोकल्याचा त्रास असलेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुले ब्रिटनमधील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ खोकला असलेल्या रुग्णांची संख्या तब्बल २५० टक्क्यांनी वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
हा खोकला केवळ जीवाणूंच्या संसर्गामुळे होत असल्याचा निष्कर्ष आहे. मात्र तौत्पुरत्या औषध उपचारानंतरही ही साथ आयोक्यात येत नसून खोकला आणि सर्दीचा त्रास अनेक जणांना जाणवू लागल्याचे आढळून आले आहे.
जुलै ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये खोकल्याचा त्रास होत असलेल्या ७१६ रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या २०२२ मध्ये याच कालावधीतील रुग्णांच्या संख्येच्या तिपटीने जास्त आहे. हा खोकला साधा खोकला नसून डांग्या खोकला असल्याचा निष्कर्ष काढला गेला आहे. यामुळे रुग्ण व्यक्तीच्या संपर्कात येणार् या व्यक्तींना जंतू संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.
सामाजिक अंतर आणि लॉकडाऊन सारख्या निर्बंधांमुळे कोविड-19 साथीदरम्यान संसर्गाची संख्या कमी झाली होती परंतु सध्या ती वाढत आहे. असे हेल्थ एजन्सीच्या सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम उपसंचालक डॉ गायत्री अमृतालिंगम यांनी सांगितले.