मुंबई – सपना चौधरीला आज प्रत्येकजण ओळखतो. सपनाचं प्रत्येक गाणं सुपरहिट होत असल्यामुळे तिचे फक्त देशातच नाही तर विदेशात देखील चाहते आहेत. वयाच्या १४ व्या वर्षांपासून सपना डान्स करते. डान्सच्या बाबतीत बॉलिवूडमध्ये देखील तिचा हात कोणी धरू शकत नाही. म्हणुणच तिच्या डान्सचे चाहते दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.
सपनाच्या एखाद्या डान्स शोची घोषणा होताच चाहते तुफान गर्दी करतात. पण तुम्हाला माहीत आहे का सपना चौधरी 3 तासांच्या शोसाठी किती फी घेते. सपना चौधरीच्या एका शोची फी जाणून तुम्हाला धक्का बसेल.सपना चौधरी कोणत्याही एका शोमध्ये काही तास परफॉर्म करते आणि एका शोसाठी तब्बल 25-30 लाख रुपये घेते. हे शुल्क खरोखरच आश्चर्यकारक आहे, परंतु सपनाची लोकप्रियता पाहून यावर विश्वास ठेवणे कठीण नाही.
केवळ स्टेज शोसाठीच नाही तर एका म्युझिक व्हिडिओसाठीही सपना चौधरी लाखोंमध्ये मोठी फी घेते. एका इंग्रजी वाहिनीच्या अंदाजानुसार ती एका गाण्यासाठी 50 लाखांपर्यंत फी घेते. सपनाचे प्रत्येक गाणे हमखास जबरदस्त हिट होते. म्हणूनच दिवसेंदिवस सपनाच्या फॅनफॉलविंगमध्ये वाढ होताना दिसत आहे.