कुणी येणार गं.! ‘सोनम कपूर’च्या घरात हलणार पाळणा, दिली गुडन्यूज

 मुंबई – हल्ली सोनम कपूर फिल्मी दुनियेपासून दूर आणि सोशल मीडियावर खूप ऍक्‍टिव्ह आहे. थोड्या दिवसांपूर्वीच सोनम कपूर लंडनवरून भारतात परत आली आहे. आल्याआल्या तिने आपल्या चाहत्यांना एक खुषखबर दिली आहे. आपल्या आयुष्यात कोणीतरी एक स्पेशल व्यक्ती येणार असल्याचे तिने आपल्या फॅन्सना सांगितले आहे. 

सोनम कपूरने इंन्स्टाग्रामवर आपला एक फोटो अपलोड केला आहे. “माझ्या आयुष्यात कोणी खास व्यक्ती येणार आहे. ही जाणीव खूपच खास आहे.’ त्या व्यक्तीचा आणि तुमचा परिचय करून देण्यासाठी मी वाट बघू शकत नाही. 

तुम्ही पण हा परिचय करून घेण्यासाठी तयार राहा.’ असे सोनमने म्हटले आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागल्यावर लोकांनी अंदाज करायला सुरुवात केली आहे. तिच्या पोस्टवरून तिच्याकडे एक गुडन्यूज असावी, असा अंदाज केला जाऊ लागला आहे.

काही दिवसांपूर्वीच सोनमच्या प्रेग्नंन्सीच्या मुद्द्यावरून तिला ट्रोल केले गेले होते. यावर सोमनने एका व्हिडीओद्वारे एक स्पष्टीकरणही दिले होते. आता सोनमच्या म्हणण्यानुसार तिच्याकडे कोणी पाहुणा येणार असेल तर त्याची घोषणा ती लवकरच करणे अपेक्षित आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.