भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने डेल स्टेनच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की डेल स्टेनने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने बीसीसीआयवर टीका करताना, ‘आयपीएल स्पर्धेत झगमगाट व पैसा यांचेच राज्य असते. आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग नव्हे तर इंडियन पैसा लीग आहे,’ असे वक्तव्य केले होते.
आयपीएलमध्ये क्रिकेटलाच दुय्यम ठरवले जाते व पैसा आणि झगमगाट यांवरच जास्त भर दिला जातो. या उलट पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत मात्र, क्रिकेटलाच प्राधान्य दिले जाते. जेव्हा तुम्ही आयपीएल खेळायला जाता तेव्हा तिथे इतके मोठे संघ, इतकी मोठी नावे असतात आणि खेळाडूंच्या कमाईवर इतका भर दिला जातो की ज्यामुळे क्रिकेट मागे पडते, असेही त्याने म्हटले होते.
डेल स्टेनच्या वक्तव्यावर अजिंक्य रहाणेची प्रतिक्रिया
दरम्यान, अजिंक्य रहाणेने डेल स्टेनच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. इंग्लडविरुद्ध होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या व्हर्चुअल पत्रकार परिषदेत अजिंक्य रहाणेला डेल स्टेनच्या या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नाचे उत्तर देताना अजिंक्य म्हणाला, “मी इथे चौथ्या कसोटी सामन्याबद्दल बोलण्यासाठी आलो आहे, न की पीएसएल आणि श्रीलंका प्रीमियर लीग बद्दल. आयपीएल बाबत बोलायचे तर या ठिकाणी भारतीय आणि विदेशी खेळाडूंना स्वता:ला सिद्ध करण्याची संधी मिळते. मला नाही माहित की, डेल स्टेन काय म्हणाला, मी फक्त या ठिकाणी चौथ्या कसोटीबद्दल चर्चा करण्यासाठी आलो आहे.”
डेल स्टेनचे वक्तव्य
क्रिकेट पाकिस्तान सोबत चर्चा करताना दक्षिण आफिकेचा वेगवान गोलेदाज डेल स्टेन म्हणाला, “मला काही कालावधीसाठी रजा हवी होती. मला असे जाणवले की, आयपीएलच्या तुलनेत इतर लीगमध्ये खेळने हे एक खेळाडू म्हणून थोडे जास्त फायदेशीर असते. मला वाटते की,जेव्हा तुम्ही आयपीएल मध्ये जाता, तेव्हा खुप मोठे स्कॉड आणि बरीच मोठी नावे असतात. या व्यतिरिक्त खुप सारे पैसे खेळाडूंना तिथे मिळतात आणि म्हणून कदाचित त्या ठिकाणी या कारणामुळे क्रिकेटचा विसरले जाते.”