कर्करोग टाळण्यासाठी ‘सेल्फ ब्रेस्ट टेस्ट’ कशी करावी?

भारतात स्तनाचा कर्करोग होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्याचमुळे अनेक महिलांना याचा धोका आहे. महिलांना याची प्राथमिक लक्षणे कळत नाही. लक्षणं न कळल्याने याचं प्रमाण जास्त असल्याचं शास्त्रज्ञ सांगतात.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) अहवालानुसार २०२० पर्यंत भारतात कर्करोगाच्या मृत्यूची संख्या सुमारे 8 लाख होईल. २०१८ मधील ग्लोबोकैनने दिलेल्या अहवालानुसार भारतात कर्करोगाच्या ११ लाख दशलक्षाहूनही नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. या आकडेवारीत ५ लाख ८७ हजाराहून अधिक महिलांचा समावेश आहे. अहवालानुसार १.५ लाखाहून अधिक स्त्रिया स्तनाचा कर्करोगाने ग्रस्त असून महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग(self breast test) सर्वात सामान्य आहे.

स्तनाचा कर्करोग ओळखण्यासाठी ही चाचणी करणे खूप सोपे आहे. ही चाचणी कोणत्याही वयोटातील तरुणी आणि स्त्रिया करू शकतात. पाळीच्या बंद झाली की आपण आरश्यासमोर उभे राहून ही चाचणी करू शकता. कारण पाळी बंद झाल्यावर स्त्रियांमध्ये सूज येत नाही. ज्या स्त्रियांना मेनोपॉज झाला आहे ते कोणत्याही दिवशी सेल्फ ब्रेस्ट चाचणी करू शकतात.

आधी आपण त्वचेमध्ये किंवा स्तनामध्ये आसपास काही बदल दिसत आहेत का नाही हे आरशात पाहण्याचा प्रयत्न करा. जर एक गाठ वाटली असेल तर, बगलापासून संपूर्ण स्तनाकडे तपासा, जेणेकरुन गाठीचा आकार कळेल.

जर आपल्याला स्तनात एक गाठ वाटली तर घाबरू नका, हे हार्मोनल बदलांमुळे देखील होऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मासिक पाळी संपल्यानंतर प्रोजेस्टीरोन हार्मोनमुळे स्तनांमध्ये गाठ किंवा कडकपणा देखील होतो. अशा परिस्थितीत प्रत्येक गाठ म्हणजे कर्करोग असणे आवश्यक नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.