“शुद्ध देसी रोमांस’मधून सुशांतसिंह राजपूतसोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी वाणी कपूर नेहमीच सोशलवर तिच्या हटके अंदाजामुळे चर्चेत असते. वाणी कपूरकडे “बेलबॉटम’, “शमशेरा’ आणि “चंदीगड करे आशिकी’ असे अनेक चित्रपट आहेत. या अभिनेत्रीला नेहमीच समीक्षकांकडून प्रशंसा मिळाली आहे.
View this post on Instagram
यावेळी सोशलवर मीडियावरील तिच्या बोल्ड व्हिडीओ चर्चेत आली आहे. वाणीने तिच्या इन्स्टाग्रामवर एका फोटोशूटदरम्यानचा शेअर केला आहे. सध्या तिच्या या व्हिडीओची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
वाणी कपूरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या पॅन्टला हात लावून तिला खाली खेचत पोज देऊन फोटोशूट करताना दिसत आहे. तिने तिच्या या व्हिडीओला फार वेगळे कॅप्शन दिले आहे. सोन्याच्या शोधात बरेच लोक चांदीला विसरतात, असे कॅप्शन तिने हा व्हिडीओ शेअर करताना दिले आहे. तिचा हा बोल्ड व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याला लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत.