नवी दिल्ली – करोना रोखण्यासाठी भारतासह जगातील अनेक देशांत लसीकरण मोहीम राबवली जात आहे. याच संदर्भात लस घेतल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे अर्थात काय करू नये याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने जारी केली आहे.
लस घेतल्यानंतर थोडे साइड इफेक्ट जाणवने ही सामान्य बाब असून त्यामुळे घाबरू जाण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले आहे. लस घेतल्यानंतर डोकं दुखणे , ताप येणे, अंग दुखणे ही सामान्य लक्षणे आहेत. करोनो प्रतिबंधक लसीला शरीर साथ देत असल्याचे हे लक्षण आहे. लस घेतल्यानंतर शरीर पुर्ववत होण्यासाठी काही काळ लागतो. त्यामुळे काही दिवस काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तसेच लस घेतल्यानंतर शरीरावर काही दिवस टॅटू काढू नये. त्यामुळे रिऍक्शन होण्याची शक्यता असते. अन्य कोणत्याही प्रकारची लस घेऊ नये असा सल्ला देखील देण्यात आला आहे. जर दुसऱ्या प्रकारची लस घेण्याची गरजच असेल तर काही आठवड्याचा कालावधी असणे आवश्यक आहे,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
लस घेतल्यानंतर काही दिवस अंगदुखीची समस्या येऊ शकते. त्यामुळे व्यायाम टाळण्याचा सल्ला दिला गेला आहे. पाणी हे शरीरातीत प्रतिकारशक्ती वाढवण्यास आवश्यक असल्याने शरीरात पाणी कमी पडू देऊ नका असेही सांगण्यात आले आहे.