गेल्या चार दशकांपासून बॉलीवूडमध्ये धमाकेदार भूमिका करणाऱ्या अनिल कपूरचे नाव यशस्वी नायकांत घेतले जाते. “वो सात दिन’पासून सुरू झालेली अनिल कपूर यांची कारकीर्द दमदार राहिली आहे. त्याने प्रत्येक परिस्थितीत संयम राखून यश मिळवले आहे. एका कार्यक्रमातून अनिल कपूरने आपल्या यशाचे गमक शेअर केले. मी नापास होण्यासाठी नेहमीच तयार असतो, असे तो म्हणाला. सुरवातीच्या काळात बॉलीवूडमध्ये काम मिळत नव्हते.
यादरम्यान त्याला तेलगु चित्रपट वम्सा वृक्षममध्ये काम मिळाले. त्यानंतर बॉलीवूड आणि हॉलीवूडपटात काम मिळू लागले. स्लमडॉग मिलेनिअरनंतर अनिल कपूरने अमेरिकेतील शो 24 साठी तयारी केली तेव्हा त्याला चाहत्यांनी ही बाब करियरसाठी घातक ठरेल, असे सांगितले. हा शो टाळण्याबाबत चाहत्यांनी त्याला विनंती केली. मात्र त्याकडे लक्ष न देता आणि अपयशाला न घाबरता हा शो पूर्ण केला आणि तो हिट झाला. यानंतर परदेशातूनही ऑफर यायला सुरुवात झाली.
24 शो चे अधिकारही मिळवले. हा शो भारतातही केला आणि त्याला प्रसिद्धीही मिळाली. अनिल कपूर यांनी प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणीवर सर्वप्रकारचे काम केले. सध्या तो पागलपंती चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अनिल कपूर, जॉन अब्राहम, अर्शद वारसी आणि इलियाना डिक्रुज ही मंडळी देखील चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट दिवाळीनंतर प्रदर्शित होणार आहे.