इंदापूरची मतमोजणी 24 फेऱ्यांमध्ये होणार

सोनाली मेटकरी ः अंतिम निकाल दीड वाजेपर्यंत जाहीर होणार
रेडा (प्रतिनिधी) –इंदापूर विधानसभा निवडणुकीच्या अंतिम मतमोजणीच्या प्रक्रियेची सर्व तयारी निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली असून, गुरुवार (दि. 24)सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 24 फेऱ्यांमध्ये सर्व मतदान केंद्रांची मोजणी करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मेटकरी यांनी यांनी दिली.

मतमोजणीसाठी 14 टेबल मांडले आहेत. प्रत्येक टेबलला 3 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. सुरुवातीला पोस्टल मताची मोजणी होणार आहे. एकूण 328 पोलिंग बूथ आहेत. 3 लाख 5 हजार 578 इतक्‍या मतदार आहेत. यात पुरुष मतदार 1 लाख 59 हजार 801 असून, यापैकी 1 लाख 23 हजार 897 पुरुष , तर 1 लाख 45 हजार 777 स्त्री मतदारांपैकी 1 लाख 8 हजार 108 स्त्री मतदारांनी मतदान केले आहे. 2 लाख 32 हजार 5 मतदारांनी मतदान केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.