Sangli Loksabha Election| सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीत निर्माण झालेला तिढा अद्याप सुटलेला नाही. यातच विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. याद्वारे त्यांनी ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करण्याचा इशारा दिला आहे. यातच विशाल पाटील यांनी माघार घेण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले पाहिजे, असे ठाकरे गटाकडून सांगितले जात आहे. यानंतर आता नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे.
सत्यजित तांबे यांचे ट्वीट
सत्यजित तांबे यांनी आपल्या एक्स हँडलवर विशाल पाटील यांचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. या ट्विटमध्ये सत्यजीत यांनी म्हटले की, “विशाल पाटलांवर काय अन्याय झालाय, हे फक्त त्यांचा संघर्ष माहित असलेल्यांनाच ठाऊक आहे. त्यांना हे पाऊल का उचलावे लागले ह्याचा विचार होणे गरजेचे आहे. राजकारणात कर्तृत्ववान युवक हवेत ह्या मताचा मी कार्यकर्ता आहे.” Sangli Loksabha Election|
Vishal Dada,
All the best !
विशाल पाटलांवर काय अन्याय झालाय, हे फक्त त्यांचा संघर्ष माहित असलेल्यांनाच ठाऊक आहे. त्यांना हे पाऊल का उचलावे लागले ह्याचा विचार होणे गरजेचे आहे.
राजकारणात कर्तृत्ववान युवक हवेत ह्या मताचा मी कार्यकर्ता आहे.वसंतदादा पाटलांचे ह्या महाराष्ट्रावर… https://t.co/wRIiaJtQMt
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) April 16, 2024
पुढे ते म्हणाले, वसंतदादा पाटलांचे ह्या महाराष्ट्रावर व आमच्या पिढीवर अनंत उपकार आहेत, विशेषतः त्यांनी केलेल्या शिक्षणाच्या क्रांतीमुळेच आज घराघरात डॉक्टर, इंजीनियर तयार होत आहेत. विशालदादा हे वसंतदादांचा कामाचा वसा व वारसा पुढे घेऊन जाण्यात पूर्णपणे सक्षम आहेत. त्यामुळेच त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, विशालदादांना कुठेतरी संधी मिळायलाच हवी, असे म्हणत सत्यजीत तांबे यांनी विशाल पाटील यांचे समर्थन केले. Sangli Loksabha Election|
दरम्यान, विशाल पाटील यांनी मंगळवारी सांगलीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह पाटील यांनी गणेश मंदिरात दर्शनानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढली. यावेळी सभेत बोलताना “आमची काँग्रेसच्या विचारधारावर आजही श्रध्दा असून माझा लढा भाजपशी आहे. काँग्रेस आणि काही घराणी संपवावी यासाठी काही जण प्रयत्न करत. यामागे कोण आहे का आहे? याचा समाचार निवडणुकीनंतर घेतला जाईल,” असा इशारा विशाल पाटील यांनी दिला. तसेच शिवसेना नेत्यांनी मशाल या चिन्हावर निवडणुक लढण्याचा प्रस्ताव दिला होता. पण आपण काँग्रेसच्या विचारधारेवर ठाम असल्याचाही खुलासाही त्यांनी केला.
हेही वाचा:
UPSC Result : ‘युपीएससी’त महाराष्ट्राचा डंका! 87 हून अधिक उमेदवारांची यशाला गवसणी; वाचा संपूर्ण यादी