Baramati Lok Sabha Elections| – यंदा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवर सर्वांचेच लक्ष लागले असून निवडणुक अधिक चुरशीची होणार आहे. या निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद-भावजय अशी निवडणूक होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे, अजित पवार, सुनेत्रा पवार आणि सुनंदा पवार अशा चौघांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास दि.12 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि.19 एप्रिल पर्यंत आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरणार आहे. जर त्यांचा अर्ज काही कारणाने बाद झाला तर पर्यायी उमेदवार म्हणून सुनंदा राजेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. Baramati Lok Sabha Elections|
सुनंदा पवार या आमदार रोहित पवार यांच्या आई आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. या मतदारसंघासाठी डमी उमेदवार म्हणून अजित पवार यांनीही उमेदवारी अर्ज नेला आहे. Baramati Lok Sabha Elections|
महाविकास आघाडी आणि महायुतीकडून येत्या गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. तसेच या मतदारसंघात अर्ज काही कारणांनी छाननीमध्ये रद्द झाल्यास उमेदवारीबाबात प्रश्न उभा राहू नये, म्हणून दोन्ही पक्षांकडून काळजी घेण्यात येत आहे. त्यासाठीचे डमी उमेदवारांचा अर्ज घेतला आहे.