मुंबई – सध्या सोशल मीडियावर ब्राझीलमधील एका व्यक्तीची तुफान चर्चा रंगली आहे. हा व्यक्ती कोणी बडा सेलेब्रिटी नसून एक बेघर माणूस आहे. जोआओ कोएल्हो गुइमारो असं या व्यक्तीच नाव असून हे ब्राजीलनमधील रहिवासी आहे.
View this post on Instagram
जोआओ कोएल्हो गुइमारो हे तब्ब्ल दहा वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून लांब आहेत. जोआओ मागील एका दशकापासून ब्राझीलमध्ये बेघरांप्रमाणे राहत होता. तो रस्त्यावर भीक मागून आयुष्य जगत होता. त्याच्याकडे ना राहण्यासाठी घर होतं ना त्याचे कोणी नातेवाईक होते.
View this post on Instagram
दरम्यान, मध्यंतरी एक व्यक्ती जोआओला भेटली आणि त्याने त्याचे आयुष्यच बदलून टाकले. एलेसेंड्रो लोबोने असं या व्यक्तीच नाव असून एलेसेंड्रोने जोआओच्या जीवनाला एक वेगळी वाट निर्माण करून दिली आहे. एलेसेंड्रो लोबो हे एक मेन्स फॅशन स्टोअर चालवतात.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी जोआओला एलेसेंड्रो हे पहिल्यांदा आपल्या दुकानामध्ये हेअरकटसाठी घेऊन गेले तेव्हा त्यांनी जोआओला भूक लागली असल्यास काही खायला मागवू का असं विचारलं. त्यावेळी जोआओने खाण्यासाठी नकार दिला. जोआओने एलेसेंड्रो यांच्याकडे दाढी करण्यासाठी रेजर देण्याची मागणी केली. त्यांची ही मागणी ऐकून एलेसेंड्रो यांनी जोआओचा आपण स्वतः हेअरकट करू असा निर्णय घेतला.
View this post on Instagram
यावेळी एलेसेंड्रो यांच्या सलून मधील एका कर्मचाऱ्याने जोआओचा हेअरकट आणि दाढी केली असून, जोआओ यांचा संपूर्ण मेकओव्हर केला. एलेसेंड्रो यांनी जोआओला तीन शर्ट, एक पॅण्ट, जॅकेट आणि बूट भेट म्हणून दिले. या नवीन मेकओव्हर मध्ये जोआओ अतिशय हँडसम दिसत आहे.
View this post on Instagram
सध्या त्याचे हे नवीन लूक मधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या फोटोंमुळे जोआओला गेल्या दहा वर्षांपासून लांब असलेल्या त्यांच्या आईला आणि बहिणीला भेटण्याची संधी मिळाली. ते जोआओला भेटण्यासाठी 17 डिसेंबर रोजी गोयनिया शहरामध्ये गेले.