मुंबई – देशभरात सगळीकडे करनोच्या साथीमुळे ख्रिसमस सेलिब्रेशन न करण्याच्या सूचना केल्या आहेत. पण बॉलीवूड स्टार्सनी आपल्या मित्रमंडळींसोबत ख्रिसमस सेलिब्रेशन करण्याचा नवीन फंडा शोधून काढला आहे. कतरिना कैफ दर वर्षी ख्रिसमसनिमित्त आपल्या घरी पार्टीचे आयोजन करते.
शुक्रवारी तिने अशीच पार्टी आपल्या घरी ठेवली होती. त्या पार्टीला विकी कौशल आणि त्याचा भाऊ सनी कौशल देखील आलेले होते. विकी आणि कतरिनाचे अफेअर चालू असल्याची चर्चा खूप दिवसांपासून सुरू आहे.
मात्र बऱ्याच दिवसांपासून हे दोघे कुठेही एकत्र दिसले नव्हते. ख्रिसमसच्या पार्टीला विकी कौशल कतरिनाच्या घरी आल्यामुळे मात्र अखेरच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे. या पार्टीला करण जोहरदेखील आला होता. मात्र त्याने जवळ असलेल्या मीडियाच्या प्रतिनिधींकडे दुर्लक्षच केले होते.
कतरिनाच्या या पार्टीमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, नेहा धुपिया, अंगद बेदी आदी मंडळी आवर्जून हजर होती. “एक था टायगर’चा डायरेक्टर कबीर खान आणि त्याची पत्नी मिनी माथुर, ईशान खट्टर आणि अनन्या पांडेही आले होते. मात्र खान मंडळींपैकी कोणीच नव्हते. याची चर्चा जोरात सुरू राहिली होती.