मुंबई – परिणिती चोप्राने अलीकडेच मालदिवच्या सुटीचे काही फोटो शेअर केले आहेत. ही सुटी ती खूप एन्जॉय करते आहे. या सुटीचा आनंद दुपटीने वाढवण्यासाठी ती एक भन्नाट आयडिया लढवणार आहे. पुढील 7 दिवस ती मालदिवच्या समुद्रामध्ये एका बोटीवर राहणार आहे.
या कालावधीमध्ये ती चक्क स्कूबा डायव्हिंग करणार आहे. ऍडव्हेंचर स्पोर्टमध्ये तिला विशेष रस आहे. पण आतापर्यंत तिने स्कूबा डायव्हिंग करण्याचा अनुभव घेतलेला नव्हता. तो अनुभव ती आता घेणार आहे. ती राहणार असलेल्या बोटीचे नाव शिवांग आहे आणि ती समुद्राच्या ज्या भागात राहणार आहे, तेथे 14 शार्क मासे आहेत अशी माहिती मिळालेली आहे.
भर समुद्रात राहणार असल्यामुळे तेथे मोबाइलचे नेटवर्कदेखील असणार नाही. तरीपण स्कूबा डायव्हिंगचे व्हिडिओ आपल्या फॅन्सपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे परिणितीने म्हटले आहे. परिणितीने मालदिवच्या ट्रिपचे खूप फोटो अपलोड केले आहेत. त्यातील एका फोटोत ती समुद्राजवळ शांत बसलेली दिसते आहे. हा फोटो बघून ती समुद्रात मेडिटेशन करत असल्याचा भास होतो आहे.