मंचर -आंबेगाव तालुक्यातील कळंब येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे स्वागत आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव भालेराव यांनी करुन ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला. जुन्नर येथे कै.
माजी आमदार शिवाजीराव काळे यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी जात असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कळंब येथे आवर्जून भेट दिली.
कळंबचे उपसरपंच डॉ. सचिन भालेराव यांच्यासह पंचायत समितीचे माजी सभापती, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आणि विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.