ऑस्ट्रेलियाच्या फिंचचा माईंडगेम
सिडनी : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर दाखल होण्यापूर्वीच त्यांची माईंडगेम सुरू झाली आहे. कोणत्याही मालिकेत सहभागी होताना ते प्रतिस्पर्धी संघावर अशीच माईंडगेम करून दबाब आणतात, मात्र त्यांच्या या खेळीला 1998 पासून केवळ भारतीय संघानेच सार्थ प्रत्युत्तर दिले आहे.
या दोन संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका हेत असून पहिला सामना येत्या मंगळवारी होत आहे. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व ऍरोन फिंच याच्याकडे आहे. फिंचने भारताला भारतात सहज पराभूत करू असे सांगत पुन्हा एकदा भारतावर दडपण यावे यासाठी माइंडगेम खेळायला सुरुवात केली आहे.
भारतीय खेळपट्ट्यांवर कसा खेळ करायचा यासाठी आम्ही व्यूहरचना तयार केली आहे. भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी आवश्यक गुणवत्ता असलेले खेळाडू संघात आहेत. त्याचबरोबर मार्नस लेबुशेन हा तर नवखा असला तरी पूर्ण भरात आहे, त्यामुळे त्याचेच आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असेल.
भारतीय फलंदाजी व गोलंदाजी
सर्वोत्तम असली तरीही आम्ही त्याच्यावर दडपण राखण्यात यशस्वी होऊ, असा विश्वासही फिंचने व्यक्त केला.
कसोटी क्रमवारीत कोहलीच अव्वल
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. भारताच्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांची घसरण झाली आहे.
धोनीकडून लवकरच निवृत्तीची घोषणा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी लवकरच एकदिवसीय सामन्यांतून निवृत्ती जाहीर करेल असे खळबळजनक विधान भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले आहे. धोनीच्या निवृत्तीवरून सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत.
एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झाला तरी तो टी-20 क्रिकेट खेळतच राहील, असेही शास्त्री यांनी सांगितले आहे. धोनीने कसोटी क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्ती घेतली आहे. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक
स्पर्धेत धोनी संघात स्थान मिळवेल मात्र त्यासाठी त्याला आयपीएलमध्ये कामगिरी सिद्ध करावी लागेल, असे संकेतही शास्त्री यांनी दिले.
कसोटी क्रमवारीत कोहलीच अव्वल
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. भारताच्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांची घसरण झाली आहे.