Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या मेळाव्यात भाषण करताना श्रीकांत शिंदे यांना अश्रु अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांचा संपूर्ण खडतर प्रवास सांगितला. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील भावूक झाले होते. याबाबत त्यांनी एक पोस्ट ट्वीटर अर्थात एक्सवर शेअर केली आहे.
‘मी शिंदे साहेबांना फक्त शिवसैनिकांमध्ये पाहिलं. ते सतत लोकांमध्ये असायचे. ते आम्हाला वेळ देत नसल्याने आम्ही आधी त्यांच्याबद्दल खूप तक्रारी करायचो,’ असं बोलत असताना श्रीकांत शिंदे भावूक झाले होते. कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे दोन दिवसीय महाअधिवेशन पार पडत आहे. या महाअधिवेशनात शिवसेनेचे वरिष्ठ नेते, शिवसैनिक उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांची पोस्ट CM Eknath Shinde on Shrikant Shinde |
“‘शिवसेना’ या चार अक्षरी मंत्राचा जयघोष करत पक्षासाठी मी माझी वाटचाल सुरू केली होती. किसन नगरच्या दहा बाय दहाच्या एकत्रित कुटूंबातून सुरू झालेला माझा प्रवास अथक प्रयत्न आणि परिश्रमाने राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत कसा येऊन पोहोचला ते श्रीकांतने आपल्या भाषणातून अगदी समर्पक शब्दात मांडले.”
‘शिवसेना’ या चार अक्षरी मंत्राचा जयघोष करत पक्षासाठी मी माझी वाटचाल सुरू केली होती. किसन नगरच्या दहा बाय दहाच्या एकत्रित कुटूंबातून सुरू झालेला माझा प्रवास अथक प्रयत्न आणि परिश्रमाने राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत कसा येऊन पोहोचला ते श्रीकांतने आपल्या भाषणातून अगदी समर्पक शब्दात… https://t.co/fQTet7K5rG pic.twitter.com/bRH52jLOaK
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 16, 2024
“शिवसेना हेच माझं सर्वस्व होतं, शिवसैनिक हेच माझं कुटूंब होतं. आयुष्यभर मी त्यांच्यासाठी काम केलं. पुढे काय होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती. नेहमी पुढचा विचार करणाऱ्या माझ्या मनाने मागे वळून कधी पाहिले नव्हते. पण आज श्रीकांतच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधून मला माझा काल दिसला,” असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.
“सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला” CM Eknath Shinde on Shrikant Shinde |
“सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला. त्यांचे भाषण जसे संपले तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो. नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले. आमच्यासह आमचे शिवसेना हे कुटूंबही पुरते हेलावून गेले. यावेळी माझ्या प्रत्येक सुख-दुःखात सोबत असलेले माझे कुटूंबीय माझे शिवसैनिक हेच या क्षणांचे सोबती होते,” असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.