ajit pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहे. त्यांच्या उपस्थितीत बारामतीतील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. अनेक ठिकाणी त्यांच्या सभा देखील होणार आहे. अशात अजित पवार यांनी अशाच एक सभेत बोलताना शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. तसेच लोकसभेत निवडणुकीबाबत त्यांनी मोठं विधान केलं आहे.
अजित पवार म्हणाले,’येत्या लोकसभा निवडणुकीत मी ज्या उमेदवाराला उभा करील त्याला तुम्ही खासदार केलं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. तुम्ही लोकसभेला आमच्या उमेदवाराला निवडून दिलं तरच मी विधानसभा निवडणुकीला उभा राहीन, अन्यथा मी निवडणूक लढवणार नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.
त्यांनी पुढे बोलतांना शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली कि,’वरिष्ठांनी सांगितलेल्या नेत्याला अध्यक्ष केला असता तर पक्ष चांगला. आम्ही अध्यक्ष झालो म्हणजे निव्वळ बेकार, यांनी पक्ष चोरला, अरे निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली आहे, विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. आम्ही आमची बाजू मांडली. जो व्हिप द्यायचा आहे तो आमच्या बरोबर आहे, उगीच आमची बदनामी का करता, म्हणजे आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्ष पद मिळालं असतं. काही झालं नसत पक्ष माझ्या ताब्यात आला असता, तुमच्या सख्ख्या भावाच्या पोटीच मी जन्माला आलो ना, त्यामुळे भावनिक होऊ नका.’ असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना दिला आहे.
हेही वाचा
ISRO । इस्रो हवामान उपग्रह प्रक्षेपित करणार, जाणून घ्या ‘नॉटी बॉय’ रॉकेट कसे काम करेल
rajayrasabha election । राज्यसभा निवडणूक बिनविरोध,अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद, नेमकं काय कारण?